
Ganeshotsav । देशात दरवर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. फक्त देशातच नाही तर विदेशातही हा सण साजरा करतात. अबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. छोट्या मोठ्या मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची स्थापना केली आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठामध्ये गर्दी पाहायला मिळत आहेत. (Konkan Ganeshotsav)
NCP Crisis । शरद पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते अजित पवारांच्या गळाला
परंतु महाराष्ट्रातील एक गाव असे आहे जिथे कोणाच्याच घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही. रायगड (Raigad) जिल्ह्यातील ‘साले’ (Sale) या गावात कोणाच्याच घरी गणपतीची स्थापना करत नाहीत. ‘भोनकरांचे गाव’ अशीही या गावाची ओळख आहे. हे गाव माणगावपासून (Sale Village Mangaon) चार किलोमीटर आणि मुंबई-गोवा महामार्गापासून दीड किलोमीटर अंतरावर वसले आहे. (Latest Marathi News)
हे आहे कारण
या गावात जर गणपती आणल्यास गावावर अरिष्ट येते, अशी गावकऱ्यांची धारणा असल्याने या गावाच्या हद्दीमध्ये कोणीही गणपती आणत नाही. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबई येथून मोठ्या प्रमाणात या गावात भक्त जातात. दरम्यान राज्यात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. साले या गावात अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळण्यात येते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्वचजण उपवास करतात आणि गावातील तलावाच्या कातळावर असणाऱ्या गणेश मंदिरात सर्वजण एकत्र येतात. गणेशमूर्तीची पूजा करून सजवलेल्या पालखीत बाप्पाला ठेवण्यात येते. तसेच तरुण ही पालखी आपल्या खांद्यावर घेऊन शंखनाद करीत तलावात उतरून पाण्यातून पालखी ३०० मीटरवरील पलीकडच्या तिरावर नेतात. विशेष म्हणजे तलावात कितीही पाणी असले तरी पाणी केवळ पालखीच्या खुरांना लागते. तिरावर आल्यानंतर गावातील प्रत्येकाच्या घराच्या दारात उभी राहते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बारामती-2 बिट शिर्सुफळ 2 अंतर्गत आज राष्ट्रीय पोषण माह अभियान