Sania-Shoaib Divorce । सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sania-Shoaib Divorce. Will Sania Mirza and Shoaib Malik divorce? Spark discussions on social media

Sania-Shoaib Divorce : । भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. सध्या देखील ते त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. या दोघांचाघटस्फोट होणार असल्याच्या चर्चा आता पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. मागच्या एक वर्षापासून हे दोघे विभक्त होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता सोशल मीडिया वरून काही संकेत दिल्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत.

Nitin Desai । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरणी ‘या’ बड्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

शोएब मलिकने इंस्टाग्राम बायोमध्ये केला बदल

शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम मध्ये बदल केल्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. शोएबने त्याच्या बायोमधून सानिया मिर्झाच नाव काढून टाकल आहे. त्यामुळे हे दोघे विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

Agriculture News | कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

दरम्यान, मागच्या काही दिवसापासून पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच अफेअर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरसह असून त्याने सानियाला फसवलं असल्याच्या चर्चा देखील मागच्या काही दिवसापासून होत आहेत. त्यामुळे हे दोघे विभक्त होण्याच्या चर्चा देखील मागच्या अनेक दिवसापासून होत आहेत. शोएब आणि आयेशा यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर वायरल झाले होते. मात्र याबाबत विचारलं असता हे फोटो एका जाहिरातीचे आहेत असे प्रश्न स्पष्टीकरण आयेशाने दिले होते.

Nitin Desai । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरणी ‘या’ बड्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

Spread the love