
Salman Khan । बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा सतत त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत येत असतो. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ज्यावेळी त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्यावेळी त्याला खूप अडचणींना तोंड द्यावे लागले होते. नुकताच बॉक्स ऑफिसवर ‘बार्बी’ (Barbie) हा चित्रपट लाँच झाला आहे. (Latest Marathi News)
तेव्हापासून या चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. अनेकांना या चित्रपटाची भुरळ पडली आहे. भाईजानलाही त्याची भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकताच अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खानचा (Arbaaz Khan) वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यावेळी सलमान खानचा तो हटके लूक चर्चेचा विषय ठरला. (Salman Khan New Look)
बर्थडे पार्टीसाठी सलमानने काळ्या टी-शर्टवर राखाडी रंगाचा शर्ट आणि गुलाबी रंगाची पँट घातली होती. सलमानचा हा हटके लूक पाहून नेटकरी चक्रावले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने ‘बार्बी भाई’ तर दुसऱ्या युजरने ‘भाईलाही बार्बीची क्रेझ आहे वाटतं’ असे म्हटले आहे.
DA Hike । केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा! ‘इतका’ वाढणार पगार, जाणून घ्या सविस्तर
लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकांना आतापासूनच त्याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिना कैफची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.
NCP Pawar Camp Meeting । आज पार पडणार शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक, कोणती रणनीती आखणार?