
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. यामध्येच आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकाच रेल्वे डब्यातून प्रवास केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
रेल्वेच्या एका डब्यामध्ये बसलेले या दोन नेत्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. त्यामुळे आता उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आज योगायोगाने शरद पवार यांच्यासह प्रवास करण्याची संधी मिळाली. मात्र आमच्या कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली होती.
सर्वात मोठी बातमी! टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) आणि गुलाबराव पाटील यांचे रेल्वे डब्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. कारण मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ज्या घडामोडी घडत आहे, त्यावरून कोण कुणासोबत जाईल? हे सांगता येत नाहीये.
‘शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर घेऊन गेला अन्..’; दर्शना पवारच्या हत्याकांडाच कारण वाचून हादराल