राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांना (Sharad Pawar) ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. “तुझा दाभोळकर करण्यात येईल”. अशा स्वरूपाची धमकी शरद पवारांना दिली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले आहे.
शरद पवारांना ज्या ट्विटर अकाउंटवरून धमकी दिली गेली आहे. त्या वापरकर्त्याच्या बायोमध्ये “मी भाजपचा कार्यकर्ता आहे कसं लिहिलेलं आहे”. त्या युजरचे नाव सौरभ पिंपळकर (Saurabh pimpalkar) असं आहे. सौरभच्या बायो मध्ये त्याने असे लिहिले की “मी भाजपचा कार्यकर्ता आहे व मला धर्मनिरपेक्षतेची खूप चीड आहे”. या ट्विट नंतर आता राजकीय वातावरणात बरेच आरोप आणि प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
आता या प्रकरणाची शरद पवार यांची कन्या, खासदार खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. त्याचबरोबर ‘ पवार साहेबांना काहीही झालं तर त्यासाठी गृहखातं जबाबदार असेल ‘ असा गंभीर इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पिंपळकर नेमका कोण? समोर आली धक्कादायक माहिती