Sanjay Shirsat | मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिला. आता यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “अजित पवार हे राष्ट्रवादीतील खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. अजित पवार यांच्या विरोधात काम करणं ही पक्षातील नेत्यांची भूमिका आहे. अजित पवार यांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादी पदाच्या नेत्यांना परवडणार नाही. म्हणून ते त्यांना सतत डावलत आहेत.
हृदयद्रावक! कधीकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर आली भीक मागण्याची वेळ
सध्या संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. आता संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या प्रतिक्रियेवर अजित पवार काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दर्शनाची हत्या करणारा आरोपी राहुल हांडोरे कोण आहे? डिलिव्हरी बॉय म्हणूनही करायचा काम…