Nitin Gadkari On Congress । एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसमध्ये (Congress) कधीच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हजरजबाबी आणि वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की ‘काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर (Srikanth Jichkar) यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला होता.’
“भाजपवाले शिंदे गटाला 50 खोके म्हणत असतील तर…”, ‘त्या’ बॅनरवरून अजित पवारांनी डिवचलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील भाजप (BJP) सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली असल्याने त्यानिमित्त एका आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी भंडारा येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेस दिवंगत नेते श्रीकांत जिचकर एकदा मला म्हणाले की, ‘तुम्ही खूप चांगले नेते आहात. तुम्ही काँग्रेस पक्षात सहभागी झाला तर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यांच्या या सल्ल्यानंतर मी त्यांना म्हणालो की, विहिरीत उडी मारुन आत्महत्या करेन पण काँग्रेसमध्ये येणार नाही. कारण भाजप आणि त्यांच्या विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी भाजपसोबत काम सुरु ठेवणार आहे.’
ब्रेकिंग! अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी समोर आली मोठी अपडेट
काँग्रेसने मागील 60 वर्षात केलेल्या कामाच्या तुलनेत भाजप पक्षाने 9 वर्षात दुप्पट काम केले आहे. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात गरीबी हटाओ असा नारा दिला असला तरी त्यांनी स्वत:चा लाभ करून घेतला, अशी जहरी टीका गडकरी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने 9 वर्षे पूर्ण केली आहेत. मोदींना देशाला आत्मनिर्भर करायचा आहे. त्यांना देशाचा विकास करून देशाला जगातील आर्थिक महासत्ता करायचे आहे. त्यासाठीची ब्लू प्रिंट तयार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Ashok Saraf Nilu Phule । ‘निळूभाऊंनी माझा नादच सोडला’ अशोक सराफ यांचं वक्तव्य