
सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहर हादरलं आहे. त्यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या असल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Nitin Gadkari On Congress । ‘एकवेळ विहिरीत उडी मारून जीव देईल पण काँग्रेसमध्ये कदापि जाणार नाही’
नालसाब मुल्ला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. परंतु संबंधित घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विश्रामबाग पोलीस दाखल झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर एकूण आठ गोळ्या झाडल्या आहेत. शहरातील 100 फुटी जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी ही घटना घडली आहे.
ब्रेकिंग! अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी समोर आली मोठी अपडेट
त्यांच्यावर आठ राऊंड फायर केले असून यापैकी त्यांच्या डोक्याला 2-3 गोळ्या लागल्या आहेत. बुलेटवर येत दोन जणांनी मुल्ला यांच्यावर गोळ्या झाडल्या आहे . परंतु हा हल्ला का केला? हल्ला करून हल्लेखोर कोणत्या दिशेला गेले? याचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वीही शहरात अशीच एक घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना शहरात गोळीबार झाला असल्याने शहर हादरले आहे.
Ashok Saraf Nilu Phule । ‘निळूभाऊंनी माझा नादच सोडला’ अशोक सराफ यांचं वक्तव्य