
Havaman Andaj । पुणे : राज्यात काही दिवसांपासून पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने हाताशी आलेली पिके जळू लागली आहेत. शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (IMD Weather Forecast) पिके धोक्यात आल्याने चारादेखील महाग झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन चारा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. (Rain Update)
अशातच आता राज्यात पुन्हा एकदा मान्सून (IMD Weather Update) आता सक्रीय झाला आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. येत्या दोन, तीन दिवस राज्यामध्ये सगळीकडे पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. प्रदीर्घ कालावधींनंतर मान्सून सक्रीय झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जर या महिन्यात दमदार पाऊस झाला तर धरणांच्या पाणीपातळीत वाढ होईल. (IMD Alert)
Covid-19 Treatment । कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळासोबत घडलं भलतंच; घटना वाचून येईल अंगावर काटा
सध्या पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट आले आहे. हवामान खात्याकडून पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडेल. सोलापूर आणि सांगली जिल्हे सोडून राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर जळगाव, धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
खरीप हंगाम जून 2022 च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन
दरम्यान, बंगालच्या उपसागरात बदललेल्या परिस्थितीमुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. तसेच अरबी समुद्रावरुन पश्चिमी वारे वाहू लागले आहे. रविवारपर्यंत राज्यात सगळीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. सक्रिय झालेल्या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट टळू शकते.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा; आता कुणबी प्रमाणपत्र…
पावसाला पोषक अशी स्थिती तयार झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला होता. भर पावसाळ्यात पाऊसच गायब झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Uorfi Javed । धक्कादायक! निर्मात्याने फाडले उर्फी जावेदचे कपडे, जबरदस्ती करत…