Buldhana News । दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; बुलढाण्यामध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Buldhana News

Buldhana News । गुरुवारी राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेलिब्रिटींनी तसेच राजकीय व्यक्तीने देखील दहीहंडीला हजेरी लावली. गोविंदांनी मोठे थर लावत दहीहंडी फोडल्या आहेत. मात्र आता या दहीहंडीला गालबोट लागले आहे. बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना दहीहंडीच्या वेळी घडली आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथे गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Buldhana News)

Havaman Andaj । राज्यात पावसाचे दमदार आगमन! ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी गॅलरी कोसळली आणि एका मुलीचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून तिच्यासोबतची दुसरी चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.

Gautami Patil Dance Show । गौतमीच्या मुंबईमधील कार्यक्रमात तुफान राडा; स्टेजखाली तरुणाला चोपले; दहीहंडी उत्सवामध्ये काय घडलं?

त्याचबरोबर, दुसरीकडे मुंबईमध्ये दहीहंडी फोडताना यंदाच्या वर्षी जवळपास 195 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही गोविंदांवर अजूनही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गोपाळकालाचा दिवस उजाडल्यापासून मुंबईमध्ये चांगलाच पाऊस सुरू होता. त्यामुळे गोविंदांना थर रचताना अनेक अडचणी येत होत्या चिखल देखील झाला होता त्यामुळे गोविंदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

Covid-19 Treatment । कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळासोबत घडलं भलतंच; घटना वाचून येईल अंगावर काटा

Spread the love