Ajit Pawar । धक्कादायक! अजितदादा गटाच्या आमदाराचा मराठा बांधवानी पेटवला बंगला

Ajit Pawar

Ajit Pawar । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. राजकीय नेत्यांची वाहने अडवण्यास मराठा बांधवांनी सुरुवात केली आहे. दरम्यान काल मराठा आंदोलकांनी थेट अजितदादा गटाच्या आमदाराचा बंगला पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी आधी तुफान दगडफेक केली आणि त्यानंतर हा बंगला पेटून दिला यामुळे संपूर्ण बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Maratha Reservation । धक्कादायक बातमी! दोन मुलांचा विचार न करता ३० वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी दिला जीव

आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवून देण्यात आला आहे. ते अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार आहेत. काल दुपारी अचानक मराठा आंदोलकांचा मोठा जमाव झाला आणि त्यांचा भला मोठा बंगला पेटून दिला. प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन मराठा बांधवांनी केले. त्यानंतर काही लोक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. आणि नंतर तो बंगला पूर्णपणे पेटवून दिला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘

Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत इंदुरीकर महाराजांनी घेतला आजवरचा सर्वात मोठा निर्णय!

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मराठा बांधव चांगलेच एकवटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोणत्या क्षणी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याची भूमिका आता मराठी बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे सरकार येत्या काळात याबाबत काही ठोस निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Andhra Pradesh Train Accident । मोठी बातमी! आंध्र प्रदेशमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या; अनेकजण गंभीर जखमी

Spread the love