Gunratna Sadavarte । मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Gunratna Sadavarte

Gunratna Sadavarte । मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर (Maratha reservation) मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेतले आहे. आज ते मान्य केलेल्या मागण्यांचा अध्यादेश घेऊन आपल्या गावी म्हणजेच अंतरवाली सराटी येथे परतत आहेत.

Manoj Jarange Patil । मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटील भावुक, म्हणाले; “मराठ्यांच्या लेकरांना आज… “

पण या अध्यादेशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार आहेत. “खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं ही माझी जबाबदारी असल्याने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. (Gunratna Sadavarte vs Manoj Jarange)

Eknath Shinde । मराठा आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! मिळाणार ‘या’ सुविधा

गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर देखील निशाणा साधला आहे.”जरांगे पाटलांचं ज्ञान काय? त्यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आहे? कोणती डॉक्टरेट मिळवली आहे? जरांगे काय म्हणतात, यावर टिआरपी मिळू शकतो. ब्लड रिलेटिव्ह ही संज्ञा सगेसोयऱ्यांसाठी गरजेची असून कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही”, असे स्पष्टीकरण गुणरत्न सदावर्ते यांनी दिले आहे.

Chhagan Bhujbal । छगन भुजबळांची मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर नाराजी, कोर्टात जाण्याची तयारी

Spread the love