Chhagan Bhujbal । छगन भुजबळांची मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर नाराजी, कोर्टात जाण्याची तयारी

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Reservation) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेतले आहे. यावर आता ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मराठा आरक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे. (Chhagan Bhujbal on Maratha Reservation)

Maratha reservation । मराठा आरक्षणावर ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ‘जरांगे पाटील तहामध्ये हरले’

“झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाहीत. सध्या सूचना जारी करण्यात आल्या असून त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील वकीलांनी देखील याचा अभ्यास करुन यावर हरकती लाखोंच्या संख्येने पाठवण्याचे प्रयत्न करावेत. ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी देखील यावर हरकती पाठवाव्यात, अशी विनंती भुजबळ यांनी केली आहे.

Maratha Reservation । मनोज जरांगे पाटील यांनी स्टेजवरुन केली शिंदेंना कळकळीची विनंती, कुणबी प्रमाणपत्र…

“सर्व सगेसोयरे कायद्याच्या चौकटीत टिकेल, असं मला वाटत नाही. मला मराठ्यांना असं निदर्शनास आणून द्यायचं आहे की तुम्हाला जिंकलात वाटतंय. पण, आरक्षणामध्ये आता ८० टक्के लोक येतील. आता तुम्हाला ईबीसीमध्ये १० टक्के आरक्षण मिळत होतं, जे आता यापुढे मिळणार नाही. तुम्ही मागच्या दाराने आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत”, असा गंभीर आरोप भुजबळ यांनी केला आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांचं आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला जीआर

Spread the love