Eknath Shinde । मराठा आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! मिळाणार ‘या’ सुविधा

Eknath Shinde

Eknath Shinde । मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सगळ्यात मोठे यश आले आहे. (Latest Maratha Reservation Update)

Chhagan Bhujbal । छगन भुजबळांची मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर नाराजी, कोर्टात जाण्याची तयारी

राज्य सरकारने मध्यरात्री अध्यादेश काढले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडलं आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. (Maratha Reservation Update) मराठा आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी काही खास सुविधा मिळणार आहेत.

Maratha reservation । मराठा आरक्षणावर ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ‘जरांगे पाटील तहामध्ये हरले’

मिळणार ‘या’ सुविधा

“आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आपण वाऱ्यावर सोडणार नाहीत. लवकरच त्यांना नोकऱ्या देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यांना मोबदला, नुकसानभरपाई म्हणून ८० लोकांना चार लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येईल. हे सरकार सर्वसामान्याचं सरकार असून गुन्हे मागे घेण्याचे आणि इतर निर्णयांची पूर्ण अमलबजावणी होईल,” असा शब्द शिंदे यांनी दिला आहे.

Maratha Reservation । मनोज जरांगे पाटील यांनी स्टेजवरुन केली शिंदेंना कळकळीची विनंती, कुणबी प्रमाणपत्र…

Spread the love