शिंदे गट आणि भाजपमधील वाद सध्या चव्हाट्यावर येताना दिसतोय. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) मुख्यमंत्र्यांनवर टीका करत ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो काय असे म्हंटले होते. त्यांच्या या वक्तव्यांनंतर तुम्ही औकातीमध्ये राहा असा सल्ला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बोंडे यांना दिला होता. यामध्येच आता हा वाद सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
कोलकाता विमानतळावर भीषण आग, प्रवाशांची उडाली तारांबळ
वाजपेयींच्या काळात 1 मताने सरकार पडलं होतं याचा विचार भाजपने करायला पाहिजे. त्यामुळे हातात हात घेऊन पुढे चालावं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये अवघड होईल, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
Ghansham Shelar । श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! घनशाम शेलार यांनी केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश
आमदार संजय शिरसाट यांच्या इशाऱ्यावर भाजपकडून (BJP) काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर शिरसाट पुढे बोलताना म्हणाले, उत्साहाच्याभरात एखाद्याच्या बाजूने असे वक्तव्य केले असेल तर आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाही. आमच्यामध्ये सगळे आलबेल असून शिंदे आणि फडणवीस एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहे. असं देखील ते म्हणाले आहेत.
मीरा रोड हत्याकांड; शरीराचे अनेक तुकडे करुनही आरोपी मनोज सुटणार? वाचा काय आहे प्रकरण