एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. तेव्हापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. अनेक नेते, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, आणि कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कोलकाता विमानतळावर भीषण आग, प्रवाशांची उडाली तारांबळ
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Ghansham Shelar । श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! घनशाम शेलार यांनी केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश
सुवर्णा कारंजे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आमदार सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, “गेली सहा वर्षे आमदार सुनील राऊत यांनी मला मानसिक त्रास दिला. काम करत असताना काम करू न देणे त्यामुळेच मी आज दु:खद अंतकरणाने शिंदे गटात प्रवेश करत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
मीरा रोड हत्याकांड; शरीराचे अनेक तुकडे करुनही आरोपी मनोज सुटणार? वाचा काय आहे प्रकरण