Rain Update 2023 | केरळमध्ये मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला मात्र महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे अजूनही आगमन झालेले नाही. सुरुवातीला अतिशय चांगल्या वेगानं मान्सून पुढेही सरकला. मात्र, तळकोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळं त्याचा वेग मंदावला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची देखील शेतातील कामे खोळंबली आहेत. (Weather Latest News)
ब्रेकिंग! खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल, शिवेंद्रराजेंविरुध्दचा ‘तो’ राडा चांगलाच भोवला
शेतकरी (Farmer) राजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. यामध्येच आता एक दिलासा देणारी माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून नेमका कधी दाखल होणार याबाबत हवामान विभागाने स्प्प्ष्टीकरण दिले आहे. (Farmer Waiting For Rain )
शरद पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने केला बीआरएस पक्षात प्रवेश
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 23 जून पासून मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारपट्टी भागात दाखल होईल. मराठवाड्यात देखील पाऊस हजेरी लावेल. त्याचबरोबर पुढील दोन दिवसांत म्हणजेच 24- 25 जूनला पावसाचा जोर कमाल असेल. राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पूर्णपणे स्थिरावेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Nana Patole । “…तर भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकणं सोपे होईल”, नाना पटोले यांचं वक्तव्य