एमपीएससीत राज्यात तिसऱ्या येणाऱ्या दर्शनाचा ‘तो’ शेवटचा व्हिडीओ आला समोर; म्हणाली, “माझ्या आई-वडिलांनी…”

'That' the last video of the third Darshan in the state in MPSC came out; Said, "My parents..."

पुणे । राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा (Darshana Pawar) मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. पुढे तपासात तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. अशातच दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोशल मीडियावर (Social media) दर्शनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Darshana Pawar Case)

ब्रेकिंग! खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल, शिवेंद्रराजेंविरुध्दचा ‘तो’ राडा चांगलाच भोवला

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती भाषण करत आहे. या भाषणात ती असे म्हणत आहे की, प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते. ती स्टोरी ऐकण्यासाठी इतर लोकांना तेव्हा आवड असते ज्यावेळी ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येत असते. आपण आपल्या स्कूल, कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो परंतु आज एवढा सत्कार होत आहे इतके लोकं आपल्याशी बोलताय, ते आपल्या मुलींना घेऊन येत आहेत. मला असे विचारत आहेत की सांग कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. माझ्या आईवडिलांनी मला हे कधीच सांगितलं नाही की तू हे करू शकत नाही, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास होता. जेव्हा आपल्याला अपयश येत असते त्यात फक्त आणि फक्त आपलीच चूक असते. परंतु ज्यावेळी आपल्याला यश मिळत असते त्यावेळी यात अनेकांचा मोलाचा वाटा असतो.

आनंदाची बातमी! पुढील 72 तास पावसाचे, पाहा एका क्लीकवर तुमच्या जिल्याचे अपडेट्स

दरम्यान दर्शना ही तिचा मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) याच्यासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली होती. तो गडावरून येताना एकटा आला होता आणि त्याच दिवसापासून तो देखील गायब झाला आहे. त्यामुळे राहुल हंडोरे नेमका कुठे गेला असावा? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Nana Patole । “…तर भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकणं सोपे होईल”, नाना पटोले यांचं वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *