सातारा | उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उपस्थित काल साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन कार्यकर्त्यांनी उधळून लावल आहे. या ठिकाणी काल दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्या हस्ते या जागेच भूमिपूजन होणार होतं. मात्र ते उधळून लावल्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये चांगलीच वादावादी झालेली पाहायला मिळाली.
Nana Patole । “…तर भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकणं सोपे होईल”, नाना पटोले यांचं वक्तव्य
आता या वादावादीनंतर सातारा शहर पोलीस (Satara Police) ठाण्यात उदयनराजे यांच्यासह 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने केला बीआरएस पक्षात प्रवेश
या तक्रारीमध्ये त्यांनी म्हंटल आहे की, जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे यांनी तक्ररीत म्हटलंय. दरम्यान, या संशयितामध्ये जिल्हा परिषदेचे माजीसदस्य, माजी नगराध्यक्ष, तसेच नगरसेवकांचा समावेश आहे.
अजित पवार यांचा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?, राजकीय घडामोडींना वेग