सध्या अपघाताच्या (accident) घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. जसे रस्ते चांगले होत आहेत तसे अपघात देखील वाढत आहेत. रस्ते चांगले असल्याने गाड्यांचे स्पीड देखील जोरात असते त्यामुळे बरेच अपघात होतात. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, गाडीचा टायर फुटल्याने, तसेच जनावर आडवे गेल्याने बरेच भीषण अपघात होतात. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिराचा वहिनीवर डोळा, कपडे बदलताना व्हिडिओ शूट केला अन् केलं धक्कादायक कृत्य; वाचून हादराल
बोलेरोचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पडोली-घुग्घूस मार्गावर झाला आहे. बोलेरो गाडीचा टायर फुटला त्यानंतर बोलेरे अनियंत्रित झाली. ही अनियंत्रित गाडी थेट उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली अन् हा भीषण अपघात झाला. (Terrible accident of Bolero burst tire)
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये बोलेरो गाडीचा चक्काचुर झाला आहे. यामुळे बोलेरोतील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांनी दिली आहे. चंद्रपूर (Chandrapur) शहरालगत बोलेरोने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली.
मॅनेरजने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर रश्मिका मंदानाने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…