देवेंद्रजी, तर तुम्हाला शवासन करावं लागणार; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा

Thakare

काल पाटणा येथे सत्ताधाऱ्यांविरोधात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे हे ‘परिवार वाचवा’ या बैठकीला गेले, असल्याची बोचरी टीका केली होती. त्यावरून फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

“अजित पवार यांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादी पदाच्या नेत्यांना परवडणार नाही म्हणून…”, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

‘देवेंद्रजी, परिवार तुम्हालाही असून तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहे. आम्ही अजून त्यावर काहीच बोललो नाही. जर बोललो तर तुम्हाला झोपावे लागेल. कारण तुम्हाला इतर कोणतेही आसन झेपणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी फडणवीसांना दिला आहे. दादर (Dadar) येथील शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. (Latest Marathi News)

हृदयद्रावक! कधीकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर आली भीक मागण्याची वेळ

तसेच त्यांनी येत्या 1 जुलै रोजी आपण महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आम्हाला असे विचारण्यात येत आहे. परंतु आम्हाला कोणाला निवेदन द्यायचे नाही. कारण ज्यांना निवेदन द्यायचे आहे तेच सत्ताधाऱ्यांच्या टेबलाखाली बसले आहेत. तुम्ही मागील दोन दिवसात ज्या घोषणा दिल्या आहेत, त्यावर तुमचे एक पुस्तकाचं काढलं पाहिजे. मी नायक आहे की खलनायक आहे, याचा निर्णय जनता घेईल. परंतु तुम्ही नालयाकच आहात’, अशी जहरी टीकाही ठाकरेंनी केली आहे.

दर्शनाची हत्या करणारा आरोपी राहुल हांडोरे कोण आहे? डिलिव्हरी बॉय म्हणूनही करायचा काम…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *