
Pune News | पुणे : आजकाल घोटाळे (Scams) खूप वाढले आहेत. फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर अनेक राजकारणी मंडळी देखील करोडो रुपयांचा घोटाळे करतात. त्यामुळे त्यांना शिक्षादेखील होते. परंतु तरीही घोटाळे वाढतच चालले आहेत. अशातच आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. एका नामंकित रुग्णालयात करोडो रुपयांचा घोटाळा (Scam in Hospital) झाल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)
रुबी हॉल हे पुण्यातील प्रसिद्ध क्लिनिक (Pune Renowned Hospital) आहे. सतत या क्लिनिकमध्ये ((Ruby Hall Clinic) ) प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परंतु याच क्लिनिकमध्ये घोटाळा झाला आहे. गरिबांसाठी असणाऱ्या इंडिजंट पेशंट फंड संदर्भात हा घोटाळा झाला आहे. या क्लिनिकमध्ये प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाबाबत धर्मादाय विभागाला अहवाल सादर करण्यात येतो. रूबी हॉल क्लिनिकला महिन्याला जितके उत्पन्न होते त्याच्या दहा टक्के रक्कम गरिब रूग्णांवर खर्च करणे बंधनकारक असल्याचा आदेश 2006 साली मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. (Scam in Ruby Hall Clinic)
Accident News । भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसचा टँकर पलटी
परंतु 2019 पासून रूबी हॉलच्या अहवालांची पडताळणी केली असता त्यात खोटी माहिती दिली असल्याचे धर्मादाय सह आयुक्त सुधीर कुमार बुक्के यांच्या लक्षात आले आहे. निधी शिल्लक नाही असे सांगत रुग्णांना माघारी पाठवले जात आहे असा आरोप केला जात आहे. तसेच एजेंट पैसे खात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.