Accident News । भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसचा टँकर पलटी

Pune Ahmednagar Highway Accident News

Accident News । सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडतच आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून, वाहनाचा टायर फुटून त्याचबरोबर जंगली जनावर आडवे जाऊन सतत कुठे ना कुठे अपघात घडल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Accident News)

Politics News । शरद पवारांच्या घरी पवार-ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास चर्चा; समोर आली महत्त्वाची माहिती

पुणे अहमदनगर महामार्गावरील (Pune Ahmednagar Highway) कोरेगाव हद्दीत गॅसचा टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती तेथील लोकांना मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Manoj Jarange Patil | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची शक्यता, मात्र…

टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने अहमदनगरकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली.

Viral Video On Social Media । गर्लफ्रेंडसमोर बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, क्षणात घडलं भलतंच; पाहा Video

Spread the love