
Bharat Ratna । भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून देशासाठी सर्वोत्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात येते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर केला आहे. (Latest marathi news)
अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आहे. “माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित केला. एस.स्वामिनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो,” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
Abhishek Ghosalkar | “…तर अभिषेक घोसाळकर यांचा जीव वाचला असता”
“बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे याना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं”, अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराने मनसेला ठोकला रामराम