Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराने मनसेला ठोकला रामराम

Maharashtra Politics

Maharashtra Politics । निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. (Election 2024) सर्व पक्ष निवडणुकीच्या तोंडावर तयारीला लागले आहेत. पहिल्यांदा राज्यसभा नंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Abhishek Ghosalkar । ब्रेकींग! अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर

पक्षाचे माजी सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर (Parashuram Uparkar) यांचा आजपासून मनसेशी कोणताही संबंध असणार नाही, असे पत्रक मनसे नेते शिरीष सावंत (Shirish Sawant) यांनी जाहीर केले आहे. तसेच उपरकर यांनी देखील तातडीने खुलासा करत पक्षातून हकालपट्टी झाली नाही, तर स्वत:हून पक्ष सदस्यत्व आणि इतर पदांचा राजीनामा दिला आहे, असे जाहीर केले आहे. (Sindhudurg Politics)

Buldhana Bus Accident । एसटी-बस आणि ट्रकचा भीषण अपघात, एकजण जागीच ठार तर १५ प्रवासी गंभीर जखमी

उपरकर यांच्या राजीनाम्यामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याचा फटका राज ठाकरेंना आगामी निवडणुकीमध्ये होऊ शकतो. दरम्यान, राज ठाकरे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सिंधुदुर्ग दौरा केला होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांना कार्यकर्त्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला होता. त्‍यामुळे राज ठाकरे यांनी या दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गची मनसे कार्यकारिणी बरखास्त केली. त्‍यानंतर ठाकरे आणि उपरकर यांच्यात बिनसल्‍याच्या चर्चा सुरु होत्या.

Sanjay Raut । धक्कादायक! मॉरिस नरोनाने घेतली चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्रांची भेट, राऊतांनी व्हायरल केले ‘ते’ फोटो

Spread the love