Abhishek Ghosalkar । घोसाळकरांच्या हत्येनंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या का झाडल्या? धक्कादायक कारण आलं समोर

Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar । ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची हत्या केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून आरोपी मॉरीस नरोना (Maurice Narona) यानेही स्वत:वर झाडल्या आहेत. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. (Latest marathi news)

Bharat Ratna । भाजपाने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या, राज ठाकरेंची मोठी मागणी

घोसाळकरांच्या हत्येनंतर (Abhishek Ghosalkar Murder) मॉरिसने स्वत:वर गोळ्या का झाडल्या? यामागचं धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या रागातून मॉरिस नरोना याने ही हत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत काही कारणं देखील समोर आली आहे. नरोना विरोधात मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्यात कलम 376 नुसार बलात्कार आणि 509 विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असून बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक करण्यात आली होती.

Devendra Fadnavis । अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एखाद्या गाडीखाली…”

स्वत:वर झाडल्या गोळ्या

या दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घेसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा असल्याने त्यातून त्यांच्यातील वैर वाढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कारवाईच्या भीतीने आणि चौकश्यांचा सिसेमिरा नको, त्यामुळे मॉरीसने स्वत:ला संपवले आहे, असे सांगितले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Abhishek Ghosalkar | “…तर अभिषेक घोसाळकर यांचा जीव वाचला असता”

Spread the love