Lalbaug Raja । मुंबई : देशात दरवर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. फक्त देशातच नाही तर विदेशातही हा सण साजरा करतात. अबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. छोट्या मोठ्या मंडळांकडून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची (Ganeshotsav 2023) स्थापना करण्यात आली आहे. परंतु या उत्सवाला गालबोट लागले आहे. (Latest Marathi News)
नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaug Raja 2023) खास ओळख आहे. गणेशोत्सवात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असतात. परंतु आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लालबागचा राजाच्या मंडपातच मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. (Lalbaugcha Raja Clash Video)
NCP । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पाच आमदारांविरोधात कार्यवाही सुरु
दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु मंडळाचे व्यवस्थापन कमी पडल्याचे समोर आले आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असणाऱ्या भाविकांना मंडळाच्याच पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली जात आहे, असे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. त्यामुळे मंडपात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Gold Silver Rate Today । खरेदीदारांनो.. करा घाई! सणासुदीच्या काळात सोने-चांदीची कमालीची घसरण