NCP । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पाच आमदारांविरोधात कार्यवाही सुरु

Proceedings started against 'those' five MLAs of NCP

NCP । मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या काही सहकारी नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Crisis) फोडला. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही खूप मोठा धक्का बसला. शरद पवारांचे जवळचे आणि विश्वासू नेत्यांनी त्यांची साथ सोडली. अशातच अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला आहे. अशातच राजकीय गोटात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)

Gold Silver Rate Today । खरेदीदारांनो.. करा घाई! सणासुदीच्या काळात सोने-चांदीची कमालीची घसरण

शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा, अशी मागणी अजित पवार गटाकडून याचिका विधिमंडळ कोर्टात केली आहे. अशातच अजित पवार गटाच्या विधान परिषदेतीला पाच आमदारांवर कारवाई करा, यासाठी शरद पवार गटाने विधान परिषदेच्या उपसभापतींकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता लवकरच याप्रकरणी लवकरच कार्यवाही सुरू होऊ शकते, असे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Khichdi Scam Case । कथित खिचडी घोटाळा, ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांची पाच तास कसून चौकशी

या आमदारांवर होणार कार्यवाही

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, सतीश चव्हाण, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आता या आमदारांनी आपली बाजू मांडावी यासाठी त्यांना नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात नोटीस बजावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ganeshotsav । महाराष्ट्रातील ‘या’ गावात कोणाच्याच घरी केली जात नाही गणरायाची प्रतिष्ठापना, कारण..

Spread the love