
Crime News । गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही, असे म्हणता येईल. कारण हल्ली गुन्हे (Crime) वाढत चालले आहेत. सध्या एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका व्यक्तीला गोळीबारासह लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest marathi news)
Ajit Pawar । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन वक्तव्याने राजकारणात उडाली मोठी खळबळ!
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना जनावरांच्या तस्करीच्या जुन्या वादातून नागपुरच्या सम्राट अशोक चौकात ही घटना घडली आहे. (Crime in Nagpur) आरोपी हा गुरांची तस्करी करतो तर जखमी झालेला व्यक्तीदेखील याच धंद्यातील त्याचा प्रतिस्पर्धी आहे. प्रतिस्पर्धी असणारा व्यक्ती गुरांच्या तस्करीबाबत पोलिसांना माहिती देतो असा संशय आरोपीला झाला होता. याच वादातून हा गोळीबार झाला. (Firing in Nagpur)
Ambadas Danve । ब्रेकिंग! अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार?

पण गोळीचा नेम चुकल्यानं मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या ठिकाणी लाठ्याकाठ्यांनी हाणामारीसह जोरदार राडा झाला. दरम्यान, या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Devendra Fadnavis । राजकारणात खळबळ! देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य