Manisha Kayande । अखेर मनिषा कायंदे यांनी सोडलं मौन; पक्ष सोडण्याचे सांगितले ‘हे’ मोठे कारण

Manisha Kayande

Manisha Kayande । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षभरापूर्वीच्या बंडामुळे ठाकरे गटाला अजूनही गळती लागले आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कायंदे यांच्या राजीनामामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटात जाताच त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

Sharad Pawar | शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, दंगली घडवण्यामागे..

बोलताना कायंदे म्हणाल्या की, ‘मी 2012 रोजी बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. मी माझं पहिलं मत शिवसेनेलाच केलं. मी आत्ताही शिवसेनेची साथ सोडली नाही, मी त्याच सेनेत आहे. फक्त नेतृत्वात बदल झाला आहे. पक्षातील श्रेष्ठींना महाविकास आघाडी पसंत नव्हती, असा खळबळजनक दावा यावेळी कायंदे यांनी केला आहे.

कोयता गँगने घातला पुण्यात पुन्हा एकदा राडा; वाहनांची केली मोठ्या प्रमाणावर तोडफोड

कारण त्यांची विचारधारा वेगळी आहे. पण शिवसेना-भाजपची विचारधारा समान आहे. मनासारखं काम करता यावं यासाठी मी पद मागत होते. परंतु, त्यांनी पद दिले नाही. त्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली नाही,’ अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वरात दारात येऊन थांबली अन् अचानक नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून हादराल

‘माझे बोलणे पक्षाने गांभीर्याने घेतली नाही, मला राजकारणाची चांगली माहिती आहे. लोक सोडून जात असताना मी काम मागितले. मला काम करण्याची इच्छा होती. परंतु, माझी पक्षाने कसलीच दखल घेतली नाही. माझी पक्षात घुसमट होत होती, असा आरोप त्यांनी केला आहे. उलट एकनाथ शिंदे यांनी मला नेहमीच साथ दिली होती. शिंदे-फडणवीस सरकार हे गतिमान सरकार असून रखडलेल्या कामांना या सरकारमुळे सुरुवात झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

मोठा अपघात! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीत वाहन घुसलं, अपघातात वारकरी गंभीर जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *