Sharad Pawar | राज्यात ठिकठिकाणी होत असणाऱ्या दंगलीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘राज्यात दंगली घडवणाऱ्या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे, असा खळबळजनक आरोप पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)
वरात दारात येऊन थांबली अन् अचानक नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून हादराल
शरद पवार हे सध्या पुणे (Pune) दौऱ्यावर असून त्यांनी लोणावळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने आयोजित कार्यशाळेच्या समासमारोपाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे.
मोठा अपघात! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीत वाहन घुसलं, अपघातात वारकरी गंभीर जखमी
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन जाणारा आपला देश आहे. परंतु, सध्या धर्म आणि जातीच्या नावाखाली समाजात मागील काही दिवसांपासून संघर्ष निर्माण केले जात आहेत. दंगली घडवणाऱ्या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे. यावरून सरकारच्या (Government) कामाची पद्धत लक्षात येत आहे’.
एक लिटर दुधाला देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत द्या; ‘या’ बड्या नेत्याची मागणी