Accident news । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी

Accident news

Accident news । समृद्धी महामार्ग (Samriddhi highway) मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. कारण या महामार्गावरील अपघाताची मालिका (Samriddhi highway accident) थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. या महामार्गावर झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. सध्या असाच एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Latest marathi news)

Nikhil Wagle । निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चॅनल खाली पडली होती. हा चॅनल चालक उचलताना जालन्याकडून (Jalna) शिर्डीकडे स्विफ्ट डिझायर कार खूप वेगाने येत होती. अचानक कार चालकाचा कारवरील ताबा सुटून कार समोर उभ्या असणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली.

Mahendra More । ब्रेकिंग! भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात कारचा जागीच चुराडा झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Nikhil Wagle । हल्ल्यानंतर निखिल वागळे यांनी सांगितला थरार; म्हणाले, “मरण डोळ्यासमोर…”

Spread the love