Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! अज्ञात व्यक्तीने दिली छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून ही धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या धमकीच्या पत्रानंतर छगन भुजबळांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Latest marathi news)

Accident news । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी

यापूर्वीही भुजबळ यांना अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मॅसेज आले होते. अशातच आता त्यांना धमकीचे पत्र आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली असून मागणीनुसार दोन पोलीस अधिकारी, अंबड पोलीस ठाण्याचे १० आणि आरसीबीचे १० पोलीस कर्मचारी भुजबळ फार्म येथे तैनात केले आहेत. (Maharashtra politics)

Nikhil Wagle । निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

शुक्रवारी भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आले आहे. या पत्रात भुजबळ यांना जीवे मारण्यासाठी सुपारी घेण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे. पत्रात पाच जणांना 50 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचे नमूद केले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना छगन भुजबळांना मिळालेल्या धमकीने एकच खळबळ उडाली आहे.

Mahendra More । ब्रेकिंग! भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

Spread the love