Nikhil Wagle । निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Nikhil Wagle

Nikhil Wagle । पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर वागळे यांच्या (अडवाणी) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mahendra More । ब्रेकिंग! भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातामध्ये घेऊ नये. मग ते कुणीही असो, भाजपचं असो किंवा इतर कुणीही असो, आम्ही त्याच्यावर कारवाई करुच. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्ये करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे”. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Nikhil Wagle । हल्ल्यानंतर निखिल वागळे यांनी सांगितला थरार; म्हणाले, “मरण डोळ्यासमोर…”

निखिल वागळेंनी दिली प्रतिक्रिया

याबाबत बोलताना निखिल वागळे म्हणाले, “याआधी देखील माझ्यावर खूप हल्ले झाले आहेत. माझ्यावर जवळपास आत्तापर्यंत सहा हल्ले झाले. सातव्या हल्ल्यातूनही वाचलो. आज हल्ला झाला तेव्हा मी काय बोललो, मरण डोळ्यासमोर होतं. ड्रायव्हर वैभवमुळे आम्ही वाचलो. त्यांनी भाजपवाल्यांपासून वाचवलं. जोपर्यंत निखिल वागळे जिवंत आहे, तोपर्यंत फॅसिसमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार”. असं निखिल वागळे म्हणाले आहेत.

Nikhil Wagle । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडली

Spread the love