Sharad Pawar | शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; म्हणाले,’ विरोधी पक्षांच्या बैठकीत..

Sharad Pawar

Sharad Pawar | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांची हालचाल सुरु झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. आज सर्व विरोधी पक्षांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटणा येथे बैठक बोलावली आहे. परंतु या बैठकीच्या सुरुवातीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांना आला भर कार्यक्रमात थेट बारामतीमधून आर्शिवाद, ‘ती’ चिठ्ठी बनतेय चर्चेचा विषय

शरद पवार यांनी बैठकीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Elections) रणनीती ठरणार आहे का? असा प्रश्न विचारताच पवार यांनी हे आज सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरून आता आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मित्राच्या लग्नाला चालले होते अन् झाला भीषण अपघात, कार उलटून चक्काचूर; ३ जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी

आजच्या बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून सगळ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

“प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *