Elvish Yadav । ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता आणि युट्युब एल्विश यादव सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या चाहत्या वर्गामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तो सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र सध्या तो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एल्विश यादव विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (A case has been registered against Elvish Yadav)
एका पार्टीमध्ये सापाचे विष आणि परदेशी मुलींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीटीवीने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप करणाऱ्या पाच गारुडींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सापांचे काही विष देखील जप्त करण्यात आले.
यावेळी त्यांनी हे विष एल्विश यादव याला पुरवायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. याप्रकरणी आता एएल्विश यादवसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुल, टिटुनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.