Urfi Javed । उर्फी जावेदला अटक? पोलिसांनी केली मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Urfi Javed

Urfi Javed । उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महत्वाचं म्हणजे तिच्या अतरंगी फॅशनमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सध्या मात्र उर्फी जावेदीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्या विरोधात थेट मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एक व्हिडिओ करणे उर्फीला चांगलेच महागात पडले असल्याचे दिसत आहे.

Elvish Yadav । एल्विश यादववर गुन्हा दाखल, रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याचा गंभीर आरोप

खोटा व्हिडिओ बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालपासून उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसला. यामध्ये छोटे कपडे घातल्याने पोलिसांकडून उर्फीला अटक असा व्हिडिओ उर्फी जावेदने तयार केला होता. मात्र तो व्हिडिओ फेक होता आणि स्वतःच उर्फी जावेदने तयार केला होता. आता तोच व्हिडिओ बनवणे उर्फीच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Earthquake in Nepal । मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने अखेर उर्फी जावेद हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त उर्फी जावेद हिच नाही तर ओशिवारा पोलिसांनी उर्फी जावेद आणि दोन अनोळखी महिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उर्फी जावेदने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तोतया पोलीस निरिक्षकला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेली चारचाकी गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

Supriya Sule । सुनील तटकरेंचं तातडीने निलंबन करा, सुप्रिया सुळेंनी केली लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी

Spread the love