Viral Video । सध्या सोशल मीडियाचा (Social media) जमाना असून अनेक जण सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याच सोशल मीडियावर आपण दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहत असतो. या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ अत्यंत गमतीशीर असतात तर काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करण्यास भाग पाडतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Viral News)
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सहा तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा दिसत आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे या तरुणी कार पार्किंग मध्ये कुस्ती करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी दोन तरुणी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत त्यानंतर त्यांचा वाद वाढतो आणि त्या एकमेकींना मारहाण करायला सुरुवात करतात. त्यानंतर या हाणामारीत अजून चार तरुणी येतात आणि सहा तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. हा ड्रामा पाहून उपस्थित लोक देखील हैराण झाले आहेत.
Sharad Pawar । राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी दुसऱ्या तरुणीच्या झिंज्या उपटते, लाथा बुक्क्यांनी तिला मारताना दिसत आहे. तरुणींची ही कुस्ती पाहून एक व्यक्ती त्यांचे भांडण थांबवण्यासाठी जातो मात्र त्याचं कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नसतात. सध्या तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @VideosIrish नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत असून अनेकजण यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याशिवाय हा व्हिडीओ परदेशातील असल्याचे देखील स्पष्ट होत आहे. मात्र कुठल्या शहरातील आहे याबद्दल काही स्पष्ट समजू शकलेलं नाही.
Sharad Pawar । शरद पवारांच्या वकिलांचे अजित पवार गटावर खळबळजनक आरोप
— aney stokes (@VideosIrish) November 8, 2023