Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिला सर्वात मोठा धक्का!

Eknath Shinde

Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते पक्ष बदलत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेदवारी न मिळाल्याने बडे नेते पक्ष बदलण्याचा निर्णय घेत आहेत. सध्या देखील पश्चिम महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शरद पवार यांनी मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar group) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Salman Khan । सलमान खानच्या घरासमोरील गोळीबाराच्या घटनेचा पहिला व्हिडीओ आला समोर; पाहा Video

माहितीनुसार, नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते करमाळा विधानसभा मतदारसंघामधून १३व्या विधानसभेत निवडून आले होते. 2014 ते 2019 या काळामध्ये ते आमदार होते. पण सध्या ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर करमाळ्यात शिंदे गटाला मोठा झटका बसणार आहे.

Supriya Sule । सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारावर सुप्रिया सुळेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

करमाळ्यात २६ तारखेला शरद पवारांची सभा होणार आहे त्या सभेमध्ये नारायण पाटील पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश करणारा असल्याची माहिती मिळत आहे. नारायण पाटील हे 2014 मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र आता शिंदे सेनेतून ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचा चर्चा सुरू आहेत.

Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य

Spread the love