Narendra Modi | गॅस सिलेंडरबाबत नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा!

Narendra Modi

Narendra Modi | भारतीय जनता पक्ष (भाजप) ने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. दरम्यान आता गॅस सिलेंडरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिला सर्वात मोठा धक्का!

नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भाजप सरकारने गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बांधली आहेत. आता, राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त माहितीचा विचार करून, त्या कुटुंबांची काळजी करताना आणखी ३ कोटी घरे बांधण्याचे वचन घेऊन आम्ही पुढे जाऊ. आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात स्वस्त पाईपचा स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू. असं ते म्हणाले आहे.

Lok Sabha Elections । बारामतीत निवडणुकीचे वातावरण कसे आहे? सुनेत्रा पवार म्हणाल्या- ‘माझी उमेदवारी…’

त्याचबरोबर पुढे मोदी म्हणाले की, युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकरी सक्षम करते. आमचे लक्ष जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाचा दर्जा आणि गुंतवणुकीद्वारे नोकऱ्यांवर आहे. मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, अशी मोदींची हमी आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही खात्री करू.

Salman Khan । सलमान खानच्या घरासमोरील गोळीबाराच्या घटनेचा पहिला व्हिडीओ आला समोर; पाहा Video

Spread the love