Eknath Shinde । धक्कादायक बातमी! मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्याचे प्रकरण, पोलीस टोळीच्या शोधात

Eknath Shinde

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरणाऱ्या टोळीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असलेले डझनभर निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची मोठी कारवाई? राजकारणात मोठी खळबळ

निवेदन देणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची (CCTV footage) मदत घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी असलेले असे डझनभर निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाले आणि पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले, तर प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी अशा कोणत्याही निवेदनावर स्वाक्षरी केलेली नाही.

Rohit Pawar । रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर सर्वात गंभीर आरोप; म्हणाले, “आमच्या काकांनी देखील…”

त्यानंतर या स्वाक्षऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला संशय आला, त्यामुळे त्यांनी याची चौकशी केली असता मुख्यमंत्र्यांनी अशा कोणत्याही निवेदनावर कधीही स्वाक्षरी केलेली नाही किंवा संबंधित विषयावर कारवाई करण्याचे आदेशही दिले नसल्याचे आढळून आले. यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील डेस्क अधिकाऱ्याने या प्रकरणाची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली. तक्रारीच्या आधारे मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री 7.30 वाजता या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे कळते.

Sushma Andhare । श्रीकांत शिंदे यांच्याबाबत सुषमा अंधारे यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांना फक्त…”

Spread the love