Bacchu Kadu । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! बच्चू कडू यांनी दिला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

Bacchu Kadu And Eknath Shinde

Bacchu Kadu । अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये (Amravati Lok Sabha Constituencies) नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, आता बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात आली आहे, यासाठी बच्चू कडू प्रचाराच्या तयारीला देखील लागले आहेत.

Pravin Mane । अजित पवार की शरद पवार कोणाला पाठिंबा देणार? सोनाई डेअरीच्या प्रविण माने यांचे मोठे वक्तव्य

बच्चू कडू यांनी आता अजून एक प्रहार केला आहे. रामटेक मध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंना बारामतीत सर्वात मोठा धक्का!

यासंदर्भात बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू मात्र नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. त्यांच्यासाठी मते मागणार नाही. असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. दरम्यान आता बच्चू कडू यांनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले त्यामुळे आता बच्चू कडू भाजपशी जुळवून घेणार नाही असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

Loksabha Election 2024। ब्रेकिंग! एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का! भाजप त्या यादीतून नावे काढून टाकणार

Spread the love