Eknath Khadse । एकनाथ खडसे अजूनही हॉस्पिटलमध्येच दाखल, नेमकी कशी आहे तब्येत? समोर आली मोठी अपडेट

Eknath Shinde

Eknath Khadse । मागच्या दोन-तीन दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या तब्येतीची चिंता वाटत आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी स्वतः प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Flight mode । काय असतो फ्लाइट मोड? तो कधी आणि कसा चालू करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सध्या त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असून, लवकरच सेवेत रुजू होईल, असे त्यांनी समर्थकांना आणि हितचिंतकांना सांगितले. त्यांनी याबाबत एक ट्विट करत माहिती दिली आहे. सध्या त्यांचे ट्विट चर्चेत आहे. (Eknath Khadse Health Update)

Bus Accident । ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली

ट्विट करत त्यांनी लिहिले की, “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! असे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे.

Sharad pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसणार; बडा नेता सोडणार पक्षाची साथ

Spread the love