Ajit Pawar । दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत उपस्थित राहणार का? समोर आली मोठी माहिती

Ajit Pawar

Ajit Pawar । सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय एकत्र येतात. दिवाळीचा पाडवा आणि बारामती मधील गोविंदबाग हे समीकरण अनेक वर्षापासून ठरलेले आहे. मात्र जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधी भूमिका घेत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. त्याचबरोबर मागच्या चार महिन्यात पवार कुटुंबीयांमध्ये संबंध कसे राहिलेत? हे सर्व राज्याने पाहिले. मात्र आता दिवाळी (Diwali) पाडव्याला पवार कुटुंबीय एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Baramti News)

Eknath Khadse । एकनाथ खडसे अजूनही हॉस्पिटलमध्येच दाखल, नेमकी कशी आहे तब्येत? समोर आली मोठी अपडेट

दिवाळी पाडव्याला दरवर्षी शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) सर्वांना गोविंद बागेमध्ये (Govind Bagh) एकत्र भेटतात. मात्र यंदाच्या वर्षी ही परंपरा खंडित होणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी अजित पवार गोविंद बागेत उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार (Ajit Pawar) आणखी काही दिवस नागरिकांना भेटणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

Flight mode । काय असतो फ्लाइट मोड? तो कधी आणि कसा चालू करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंबे एकत्र येत असतात आणि जनतेच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. पवार कुटुंबीयांवर प्रेम करणारे सर्वजण दिवाळी पाडव्याला गोविंद बागेत जातात आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांना भेटतात. मात्र यंदाच्या पाडव्याला अजित पवार गैरहजर राहणार आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अजित पवार यासाठी उपस्थित राहणार नाहीत.

Bus Accident । ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली

Spread the love