Sharad pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसणार; बडा नेता सोडणार पक्षाची साथ

Sharad Pawar

Sharad pawar । राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला रायगडमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील माजी आमदार थेट भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात भर रस्त्यात प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार, कोट्यवधीचे दागिने लुटले

मागच्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या बंडामुळे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या गटांमध्ये सर्वात जास्त आमदार आहेत तर शरद पवार यांच्या गटांमध्ये मोजकेच आमदार आहे. हे सर्व असतानाच आता पुन्हा एकदा शरद पवार गटातील एक माजी आमदार कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड (MLA Suresh Lad) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Sharad Pawar-Uddhav Thackeray । शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा

काही राजकीय मतभेदामुळे सुरेश लाड यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा हा निर्णय शरद पवार गटासाठी धोकादायक करू शकतो. कारण त्यांच्यासह कर्जतचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाला कर्जत मध्ये मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Viral News । लग्नानंतर काही दिवसातच पतीला समजले पत्नीचे भयानक रूप!

Spread the love