राजस्थान (Rajasthan) मधील बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी प्रेमाला (love) विरोध केला म्हणून दोघांनी मिळून आत्महत्या केली आहें. एकमेकांशिवाय राहू शकत नाही म्हणून त्या दोघांनी टोकाचं पाऊल उचलले आहे. त्या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
‘या’ कारणामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीच झाला नवरा बायकोचा मृत्यू; वाचून हादराल
अधिक माहिती अशी की, नरेश कुमार यांची 19 वर्षाची मुलगी खुशी आणि बाबूलाल यांचा 21 वर्षाचा मुलगा ओमप्रकाश असे मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे. हे दोघे एकमेकांवर जिवापाड प्रेम करत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी खुशीच्या वडिलांनी तिचे लग्न जमवले होते. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला होता. खुशीचा साखरपुडा झाल्यानंतर खुशी आणि ओमप्रकाश प्रचंड तणावाखाली गेले. त्या दोघांना हे लग्नं मान्य नव्हते. खुशी आणि ओमप्रकाश यांना लग्नं करायचं होतं. पण घराच्यांचा त्यांच्या लग्नाला नकार होता. त्यामुळे त्या दोघांनी एक रात्री भेटायचं ठरवलं.
Sharad Pawar । धमकी मिळाल्यांनतर शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला पोलिसांवर…”
खुशी आणि ओमप्रकाश बुधवारी रात्री भेटले. भेटल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर सेल्फी काढली. काढलेल्या सर्व सेल्फी स्टेटसला ठेवल्या. शेवटचे क्षण मनसोक्त जगले. त्यानंतर त्यांना दोघांनी गळफास लावून घेतला. रात्री दोघेही घरी नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. ते दोघे पळून गेले असावेत असा अंदाज बांधला जात होता. त्यावेळी या दोघांचा मृत्यू झाला होता.
झारखंडमध्ये घडली धक्कादायक घटना! कोळसा खाणीत भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण जखमी
खुशीची आई तिचा शोध घेत घेत गावच्या सरकारी शाळेजवळ आली. त्यावेळी तिला ते दोघे झाडाला लटकलेले दिसले. ते पाहून तिने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज एकून गावातील लोक गोळा झाले. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनानंतर दोघांचे ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नक्की तो भाजपचाच कार्यकर्ता आहे का? शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न