आयपीएल (IPL) प्रमाणेच आता लवकरच एमपीएल (Maharashtra Premier League) आपल्या भेटीला येणार आहे. आयपीएल संपलं म्हणून क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये नैराश्य पसरलेलं, असतानाच एमपीएल चालू झाल्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटसाठी उत्साही वातावरण तयार झालं आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super kings) यावर्षीचा किताब जिंकून पाच ट्रॉफीजची दावेदारी मारली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (Maharashtra cricket association) 16 ते 29 जूनच्या भरवली आहे.
सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का?, भाजपच्या ‘या’ आमदारावर बारामतीची जबाबदारी
महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये सहा संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स (Chhatrapati Sambhaji king) ही तीन मराठवाड्याची धुरा संभाळणार आहेत. या संघाचे मालक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे आहेत. त्या संघाची जबाबदारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे. आयपीएलप्रमाणे एमपीएल यांची लिलाव झाला होता. त्यामध्ये छत्रपती संभाजी किंग्जने 22 प्लेयर्स खरेदी केले आहेत. त्यामधील अकरा खेळाडू मराठवाड्यामधीलच आहेत.
रोहित शर्माने भरमैदानात ‘या’ बड्या खेळाडूला दिल्या शिव्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपापले आयकॉन प्लेअर्स निवडले त्यामध्ये भारतासाठी 19 वर्षाखालील विश्वचषक खेळणारा त्याचबरोबर रणजी खेळाडू आणि आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा फास्ट कॉलर धाराशिवकर राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hungergekar) हा छत्रपती संभाजी किंग च्या बाजूने खेळणार आहे. आयपीएल मधील धोनीच्या सीएसके (चेन्नई सुपर किंग्ज) टीम कडून खेळणारा धनंजय राजवर्धन आता एमपीएल मध्ये धनंजय मुंडे यांच्या सीएसके (छत्रपती संभाजी किंग्ज) कडून खेळणार आहे.
मीरा रोड हत्याकांडाबाबत आरोपीने केले अनेक धक्कादायक खुलासे, पोलिसही चक्रावले…