मान्सूनचे केरळमध्ये (Arrival of Monsoon in Kerala) आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) ही घोषणा करण्यात आलेली आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे आता महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार अशी आशा लोकांना लागून राहिली आहे.
सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का?, भाजपच्या ‘या’ आमदारावर बारामतीची जबाबदारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होतो मात्र यावेळी पाऊस ८ जूनला केरळमध्ये पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक देखील जाणवू शकतो. असं हवामान तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
रोहित शर्माने भरमैदानात ‘या’ बड्या खेळाडूला दिल्या शिव्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
यावर्षी जवळपास एका आठवडा उशिरा केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. लवकरात लवकर राज्यात देखील पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी प्रचंड उन्हाळ्याची झळ लोकांना सोसावी लागली. मान्सून देखील यावर्षी उशिराने दाखल झाला आहे. परंतु आता केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेला पूर्णविराम लागला आहे. केरळमधील बऱ्याच भागांमध्ये काल पावसाला सुरुवात झाली आहे.
मीरा रोड हत्याकांडाबाबत आरोपीने केले अनेक धक्कादायक खुलासे, पोलिसही चक्रावले…