Dhangar Reservation । मोठी बातमी! पिवळं वादळ धडकणार राजधानीत, १००० गाड्यांचा ताफा घेऊन धनगर समाज मुंबईच्या दिशेने रवाना

Dhangar Reservation

Dhangar Reservation । राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा (Reservation) प्रश्न बिकट होत चालला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. आधी मराठा समाज (Maratha Reservation) तर आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. (Reservation protest)

Manoj Jarange । ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, भाजपने केली मोठी मागणी

बीडच्या अंबाजोगाई येथू मुंबईच्या आझाद मैदानाकडे हजारोंच्या संख्येने समाज बांधव 1 हजार गाड्यांचा ताफा घेऊन रवाना झाले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही भूमिका धनगर समाज बांधवांकडून करण्यात आली आहे. सरकार केवळ धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत वेळ काढूपणा करत आहे, असाही आरोप केला जात आहे. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । एसआयटी चौकशीबाबत मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ” आता मी देखील सर्व उघड..”

दरम्यान, दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत धनगर समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील न्यायालयाने स्पष्ट केले होते. हा धनगर समाजासाठी सर्वात मोठा धक्का होता. अशातच आता सरकार त्यांच्या आरक्षणाची दखल घेतेय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Devendra Fadnavis । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांच्या मागे कोणाचा हात? सर्व गोष्टी येऊ लागल्या बाहेर

Spread the love