Maharashtra Budget । अजित पवारांनी सादर केला अंतरिम अर्थसंकल्प, केल्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा

Maharashtra Budget

Maharashtra Budget । आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल. यात चार महिन्यांच्या खर्चाची देखील तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात एकूण 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवला आहे. (Latest marathi news)

Dhangar Reservation । मोठी बातमी! पिवळं वादळ धडकणार राजधानीत, १००० गाड्यांचा ताफा घेऊन धनगर समाज मुंबईच्या दिशेने रवाना

जाणून घेऊयात अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा

  • अटल सेतू – कोस्टल रोड जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती
  • सोलापूर-तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपान सुरू
  • ऊसतोड कामगारांकरिता अपघात विमा योजना
  • मातंग समाजासाठी “आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना
  • कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18 हजार 816 कोटी रुपये
  • मुर्तीजापूर -यवतमाळ रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी पन्नस टक्के निधीची तरतूद
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पाचशे कोटींचा निधीची तरतूद
  • राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निवारण उपाययोजना सुरू
  • जुन्नरमध्ये शिवसंग्राहालय उभारण्यात येईल
  • युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
  • निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क
  • कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु
  • दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा
  • राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण
  • सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच
  • राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर
  • नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी शंभर कोटींची तरतुद
  • राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न
  • राज्यात 200 सिंचन प्रकल्पाची कामं सुरू
  • कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन
  • वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना- कर प्रशिक्षण अकादमीची स्थापना

Manoj Jarange । ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, भाजपने केली मोठी मागणी

Spread the love